आरोग्यधाम
मानवी आरोग्यावर लक्ष केंद्रित करणारे आरोग्यधाम — नियमित तपासणी, आरोग्य शिबिरे, रक्तदान व गरजूंना वैद्यकीय उपचार.
आरोग्यधाम
मानवी आरोग्यावर लक्ष केंद्रित करणारे आरोग्यधाम विकसित केले जाईल. योगासने आणि शारीरिक व्यायाम यांचा समावेश असेल. त्यासोबत सर्व सामान्य जनतेचा विकास होण्यासाठी आवश्यक उपाययोजना आखणे, त्यांची अमलबजावणी करणे, सर्व सामान्यांना स्वावलंबी करणे, त्यांना रोजगार निर्मिती करणे, जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देणे आणि गोरगरीबांना न्याय मिळवून देणे यावर भर दिला जातो.
येथे सुसज्ज आरोग्य सेवा आणि नियमित आरोग्य तपासणीची व्यवस्था असेल. सरकारी व खाजगी संस्थांसोबत भागीदारी करून आवश्यक वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून दिले जाईल.
आरोग्य शिबीर आयोजित करणे, रक्तदान शिबीर आयोजित करणे, गोरगरीबांची वैद्यकीय तपासणी करणे आणि गरजूंना वैद्यकीय सहाय्य निर्माण करून देणे.
आरोग्यधामचे प्रमुख उपक्रम
नियमित आरोग्य तपासणी
सर्वांसाठी नियमित आरोग्य तपासणीची व्यवस्था
आरोग्य शिबिरे
समुदायासाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन
रक्तदान शिबिरे
रक्तदान शिबिरांद्वारे जीवनरक्षणाचे योगदान
वैद्यकीय सहाय्य
सरकारी व खाजगी संस्थांसोबत भागीदारीने मदत
योग व शारीरिक व्यायाम
निरोगी जीवनशैलीसाठी योगासने व व्यायाम
सामुदायिक आरोग्य
गरजू व गोरगरीबांना न्याय व वैद्यकीय सहाय्य
आरोग्य उपक्रमाशी जोडले जा
आपल्या दानामुळे अनेक गरजूंना आरोग्य सेवा उपलब्ध होऊ शकते. आजच योगदान द्या.
दान करा